शिवसैनिकांनी भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला. त्यांनतर किरीट सोमय्यांतर्फे खोटी एफआयआर दाखल केल्याचा आरोप आज सोमय्या यांनी केला आहे. मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असे त्या बोगस एफआयआर मध्ये लिहलेलेच नाही, असे सोमय्या यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी मुंबई पोलिसांचा उल्लेख उद्धव ठाकरेंचे पोलीस असा केला.
त्याचबरोबर आज खार पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार देणार असल्याचंही त्यानी यावेळी सांगितलं.