फक्त रात्रीच कंडोमच्या जाहिराती दाखवा, केंद्र सरकारचे आदेश

रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच कंडोमची जाहिराती दिसणार

टीम महाराष्ट्र देशा: कंडोमच्या जाहिराती लहान मुलांसाठी निरोपयोगी आहेत त्यामुळे कंडोमच्या जाहिरातींच्या दाखवण्याच्या वेळेवर केंद्र सरकारने काही ठराविक निर्बंध घातले आहेत. रात्री १० ते सकाळी ६ वाजल्याच्या दरम्यानच या जाहिराती दाखवाव्या असे सक्त निर्देश माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत.

कंडोमच्या जाहिराती या एका विशिष्ट वयोगटातील व्यक्तींसाठी आहेत. त्या लहान मुलांसाठी निरुपयोगी आहेत. त्यामुळे त्या रात्री 10 ते सकाळी 6 या रात्रीच्या वेळेतच दाखवल्या जाव्यात, अशी सूचना सरकारने टीव्ही चॅनल्सला केली आहे.लहान मुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या किंवा त्यांना हानिकारक गोष्टींविषयी रुची नर्माण करणाऱ्या जाहिरातींना परवानगी देण्यात येऊ नये, या नियमाअंतर्गत हा आदेश दिला असल्याचं सरकारने म्हटलं आहे.