fbpx

नाना पाटेकरांच्या भाजप प्रवेशाची केवळ अफवाचं, शहा भेटीचं खर कारण वेगळचं

नाना पाटेकर

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. हे इनकमिंग केवळ अन्य पक्षातील नेत्यांचेचं नव्हे तर सिने अभिनेते आणि खेळाडूंचे देखील होत आहे. बॉलीवूड अभिनेते नाना पाटेकर हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्या संदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे. मात्र ही भेट राजकीय नसून अन्य काही कारणासाठी घेतली आहे, असे नाना पाटेकर यांनी सांगितले आहे.

नाना पाटेकर यांनी सोमवारी अमित शाह यांना भेटण्यासाठी दिल्लीतल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये गेले होते. जवळपास 20 मिनिटे नाना आणि शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर नाना पाटेकर यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरु झाल्या. मात्र नाना यांनी यावर स्पष्टीकरण दिले, अमित शहांची घेतलेली भेट ही सांगली, कोल्हापुरातल्या पूरग्रस्तांसाठी होती. संस्थेला परदेशातून येणारा निधी स्वीकारण्यासाठी एफसीआरए सर्टिफिकेट मिळणं आवश्यक असतं. त्याची परवानगी मागण्यासाठी आपण शाह यांना भेटल्याचे नानांनी सांगितले.

मात्र तरीदेखील राजकीय वर्तुळात नाना यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु आहे. हरियाणात सपना चौधरी, कुस्तीपटू बबिता फोगाट यांच्या भाजप प्रवेशाची उदाहरणं ताजी आहेत. त्यामुळेच नाना पाटेकर यांच्याबद्दलही या चर्चेनं जोर धरला आहे. तसेच नाना पाटेकर गेल्या काही वर्षांपासून नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मग्न आहेत. पडद्याबाहेरच्या खऱ्या आयुष्यातही समाजमनावर प्रभाव टाकणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे. नाम फाऊंडेशनच्या कामानं जोर घेतला तेव्हाचं नाना राजकारणात येणार का? अशी चर्चा सुरु झाली होती.