पीक विम्यापोटी परभणीत फक्त ६५ कोटींचे वाटप, शेतकऱ्यांमधून संताप

farmer

परभणी : शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी पंतप्रधान विमा योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीची तीन वर्षांसाठी केंद्र शासनाने परभणी जिल्ह्यासाठी निवड केली. खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये पिकांचे मोठे नुकसान होऊनही विमा कंपनीने केवळ दीड लाख शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई अदा केली.

त्यामुळे केंद्र, राज्य व शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ता असे एकूण जवळपास २४० कोटींहून अधिक रुपये विमा कंपनीकडे जमा झाले. मात्र, त्यातील केवळ ६५ कोटींचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केले. त्यामुळे पहिल्याच वर्षी एकट्या परभणी जिल्ह्यात दीडशे कोटींचा नफा विमा कंपनीला झाल्याची चर्चा जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.

नुकसानीचे पंचनामे करून प्रति हेक्टरी राज्य शासनाने ८ हजार ६०० रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना अदा केले. मात्र शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीला कळविले नाही, ही आडकाठी टाकून कंपनीने विमा देण्यास नकार दिला.

महत्त्वाच्या बातम्या

IMP