जे चांगले वाईट होईल त्याला केवळ भारतीयच जबाबदार राहतील : मोहन भागवत

mohan bhagavat on raygad

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून देशभरात सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून देशात तणावाचे वातावरण आहे. नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपली भूमिका मांडली आहे. मंचावर महानगर संघचालक सरकार्यवाह भय्याजी जोशी, विदर्भ प्रांताचे संघचालक राम हरकरे, राजेश लोया व सहसंघचालक श्रीधर गाडगे उपस्थित होते.

‘देश खंडित झाला असला तरी, स्वतंत्र आहे. ते टिकून ठेवणे व शासन व्यवस्थित चालविणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता ब्रिटिशांना दोष देऊन चालणार नाही. जे चांगले वाईट होईल त्याला केवळ भारतीयच जबाबदार राहतील. त्यामुळे ब्रिटिशांच्या काळासारखे वागून चालणार नाही. प्रत्येकाला विचारपूर्वक वागावे लागेल, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

Loading...

तसेच, भारतीय नागरिकतेचे पालन करणे म्हणजेच देशभक्ती असल्याचे संविधान प्रदान करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत केलेल्या भाषणात म्हटले होते. त्या नागरिकतेचे पालन करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. देशाच्या भल्यासाठी जगणाऱ्या स्वयंसेवकाची निर्मिती संघशाखेत होते. केवळ स्वत:चा विकास अशी स्वार्थी धारणा न ठेवणारे हे स्वयंसेवक समाजाचाही सामुहिक विचार करतात. राष्ट्राला परम वैभवसंपन्न करायचे असून, हीच जीवनशैली प्रत्येकाने स्वीकारावी असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका