‘सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक’

sushant singh

मुंबई : देशातील सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरील फोकस अन्यत्र नेऊन, सुशांतसिंह प्रकरणाच्या तपासाला महत्त्व देण्यामागे बिहारमधील विधानसभा निवडणुकीतील राजकारण कारणीभूत आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शनिवारी केली.

सुशांतसिंह प्रकरण माध्यमांमध्ये नेहमी चर्चेत राहील याची तजवीज केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी केली असल्याचा आरोपही काँग्रेसच्या वतीने सावंत यांनी केला आहे. त्यामुळे ड्रग आणि बॉलिवूड यांच्यातील कथित सुरस संबंधाच्या माहितीचा रतीब पुरविला जात आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमार्फत होणाऱ्या चौकशीत मिनिटामिनिटाची माहिती बाहेर येत आहे. ती माहिती कोण देत आहे हे जनतेला ज्ञात आहे. अथवा मुद्दामहून त्या चौकशीतील माहिती लीक केली जात आहे काय, असा सवालही सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-