एसटीच्या २२०० कर्मचाऱ्यांसाठी केवळ ९० ड्रेस

st1

उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये विभागीय मंडळनिहाय कर्मचाऱ्यांना नव्या ड्रेसचे वाटप होणार होते.मात्र, गणवेशाच्या अपु-या साठ्यामुळे हा कार्यक्रम पाच मिनिटांत संपविण्यात आला. एसटी महामंडळाने तब्बल ७३ कोटी खर्च करुन कर्मचा-यांसाठी नवे गणवेश तयार केले. ड्रेस वाटप कार्यक्रमात २२०० कर्मचारी उपस्थित होते. मात्र, केवळ ९० ड्रेसच आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आले होते.

st

या गणवेशामध्येही अर्ध्याहून अधिक कर्मचा-यांचे गणवेश मापात नसल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांनी पाच महिन्यापूर्वीच आपली मापे दिली होती. ती मापे न जुळल्याने आलेले ड्रेसही परत घ्यावे लागले आहेत. ३२ प्रकारच्या ड्रेसपैकी केवळ तीन प्रकारचे ड्रेस उस्मानाबाद विभागात दाखल झाले आहेत. दरम्यान, महिला कर्मचाऱ्यांच्या साडीची किंमत ६३० रुपये आणि सलवार कुर्त्याची किंमत ९९८ आहे.