fbpx

लोकसभा निवडणुकांसाठी उरले फक्त ८० दिवस !

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचा संभाव्य कार्यक्रम “पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’(प्राब)ने जाहीर केला असून याप्रमाणे महाराष्ट्रात ३ टप्प्यात मतदान होण्याची शक्यता असून लोकसभेसाठी पहिला टप्प्यात २८ एप्रिलला मतदान घेण्यात येऊ शकते तर ५ आणि १२ मे मध्ये अनुक्रमे दुसरया व तिसऱ्या टप्प्यात मतदान होऊ शकेल. या संभाव्य लोकसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून ७ ते १२ मार्च २०१९ दरम्यान होणाची संभावना असून नामनिर्देशन पत्र पहिल्या टप्प्यासाठी १५ एप्रिल २०१९ तर दुसऱ्या टप्प्यासाठी २१ एप्रिल २०१९ पासून उपलब्ध होऊ शकणार आहे. देशात एकूण ९ टप्प्यात निवडणुका घेण्यात येतील व अंतीम मतदानानंतर २६ अथवा २८ मे २०१९ रोजी मतमोजणी देशभरातील सर्व मतदारसंघातील एकत्रितपणे होऊ शकणार असल्याचे “प्राब’’ने म्हटले आहे.

संभाव्य निवडणुक कार्यक्रमानुसार इच्छूकांना लोकसभा निवडणुकांची पूर्वतयारी करण्यासाठी केवळ ८० दिवस उरले आहेत. सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश एका लोकसभा मतदारसंघात असल्याने व्यापकतेनुसार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कल्पक व अत्याधुनिकीकरण सुविधांचा वापर करावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकांची उमेदवारांनी पुर्वतयारी करणे शक्य व्हावे. याकरीता वेळेचे काटेकोरपणे नियोजन करण्याकरीता या संभाव्य निवडणुक कार्यक्रमाचा उपयोग निवडणुक लढविणा-यांना होणार असल्याचे “पॉलिटिकल रिसर्च अँँड अनालिसेस ब्युरो’’(प्राब)चे अध्यक्ष चंद्रकांत भुजबळ यांनी सांगितले. वरील निवडणुक कार्यक्रम संभाव्य म्हणून सुनियोजित करण्यात आला असून यामध्ये निवडणुक आयोगाचा अंतिम कार्यक्रम ग्राह्य धरावा असे आवाहनही संस्थेने केले आहे.

“पॉलिटिकल रिसर्च अँँड अनालिसेस ब्युरो’’ ही राजकीय क्षेत्रातील नामवंत सल्लागार संस्था आहे. राजकीय क्षेत्रात शिक्षण व प्रशिक्षण देणारी पहिली सर्वेक्षण व अनालिसेस करून देणारी एकमेव संस्था असून गेली २५ वर्षापासून देशभरात कार्यरत आहे.

लोकसभा निवडणुकांचा संभाव्य निवडणुक कार्यक्रम असा असू शकेल 

लोकसभा मुदत- 4 जून २०१४ ते ३ जून २०१९ कालावधी आहे. ३ जून २०१९ पर्यंत १७ वी लोकसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे.

११ जानेवारी २०१९ ला अंतिम मतदारयादी जाहीर होणार आहे ही यादीच लोकसभा निवडणुकांसाठी ग्राह्य असणार आहे.

लोकसभा निवडणुकांची महाराष्ट्रात आयोगाकडून तयारी /आवश्यक सुविधांसाठी निविदा प्रक्रिया सुरु.

अर्थसंकल्पीय अधिवेशन व दहावी बारावीच्या परीक्षांचा कालावधीनंतरच निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होईल.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 18 फेब्रुवारीऐवजी 25 फेब्रुवारी 2019 पासून होणार आहे. ते ८ दिवस कामकाज पार पडेल. अंतिम अर्थसंकल्प जूनमध्ये आचारसंहिता संपल्यावर मांडण्याची शक्यता.

गुरुवार 21 फेब्रुवारी 2019 ते बुधवार 20 मार्च 2019 या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा आहे.

शुक्रवार 1 मार्च 2019 ते शुक्रवार 22 मार्च 2019 दरम्यान दहावीची लेखी परीक्षा आहे.

सीबीएसई बोर्डाच्या 12वी ची परीक्षा 15फेब्रुवारी पासून 3 एप्रिल दरम्यान होणार आहे.

सीबीएसई बोर्डाच्या दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत असणार आहे.

2 Comments

Click here to post a comment