पावसाळ्याचे उरले फक्त ४७ दिवस ; परतीच्या पावसाकडे बळीराजाचे लक्ष!

पावसाळ्याचे उरले फक्त ४७ दिवस ; परतीच्या पावसाकडे बळीराजाचे लक्ष!

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा पावसाचे एकुणच प्रमाण कमी आहे. जायकवाडीसह विभागातील अनेक धरणे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. विभागात ८७९ प्रकल्पांत फक्त ४७ टक्के पाणीसाठा आहे. ११ मोठ्या प्रकल्पांत ५३ टक्के पाणी असून, सर्व धरणांची तहान वाढू लागली आहे. त्यातल्या त्यात ऑगस्ट महिना आतापर्यंत कोरडाठाक आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाचे पुनरागमन होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याचे फक्त ४८ दिवस उरले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.

नाशिकपासून औरंगाबादपर्यंतच्या गोदावरी नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे विभागातील गोदावरी नदी पात्रावरील विष्णुपुरी वगळता सर्व प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. कोकणासह पुणे विभागातील काही जिल्ह्यांत महापुराने थैमान घातले तर नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलप्रकल्प क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे निसर्गाचा असमतोल यंदाच्या पावसाळ्यात दिसत आहे. विभागातील सर्व ८७९ प्रकल्पांत ३ हजार ७९६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.

८ हजार १९७ दलघमी पाणी साठवण क्षमता या प्रकल्पांत आहे. मोठ्या प्रकल्पांत क्षमतेच्या तुलनेत ५३ टक्केच जलसाठा असल्यामुळे विभागाची चिंता वाढली आहे. या प्रकल्पांत ३ हजार ७९६ दलघमी पाणीसाठा सध्या आहे. मोठ्या ११ प्रकल्पांवरच विभागातील ६० टक्के भूभागाची तहान भागते. त्यामुळे या प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. विभागातील आठही जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत आजवर ६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. चार मोठ्या प्रकल्पात ६० टक्क्यांच्या पुढे जलसाठा आहे. जायकवाडीत फक्त ४० टक्के साठा आहे.

महत्त्वाच्या बातम्या