ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंग झाल अवघड; आयआरसीटीसीने केले सहा बँकांचे डेबिट कार्ड बंद

वेब टीम:- रेल्वेचे ऑनलाइन तिकिट बुकिंग करण्यासाठी सहयोगी कंपनी असलेल्या इंडियन रेल्वे कैटरिंग एंड टूरिजम कॉरपोरेशन (IRCTC) ने सहा बँकांचे डेबिट कार्ड ब्लॉक केले आहेत. आयआरसीटीसीला या सहा बँकांनी सुविधा शुल्क देण्यास नकार दिल्यामुळे सहा बँकांचे डेबिट कार्ड ब्लॉक करण्यात आले आहेत. या बँकामध्ये भारतीय स्टेट बँक व आईसीआईसीआई बँकचाही समावेश आहे. त्यामुळे या सहा कार्ड धारकांना आता ऑनलाइन तिकीट बुक करता येणार नाहीत. आयआरसीटीसीने आपल्या वेबसाइट वर बुकिंग करताना ग्राहकांकडून घेण्यात येणाऱ्या सुविधा शुल्काचा निम्मा हिस्सा मागितला होता. मात्र, याला बँकांनी नकार दिला त्यामुळे आयआरसीटीसीने हा निर्णय घेतला आहे.

नोटबंदी झाल्यानंतर ऑनलाइन बुकिंगवर असलेला सर्विस टॅक्स बंद केला होता. त्या आधी स्लीपर क्लाससाठी 20 रुपये तर एसी क्लाससाठी 40 रुपये सुविधा शुल्क आकारण्यात येत होते. इंडियन ओवरसीज बँक, कैनरा बँक, यूनाइटेड बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि एक्सिस बँक अश्या काही ठराविक बँकांना यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या कार्ड धारकांनी ऑनलाइन तिकिट बुकिंग करण्यास हरकत नाही .

You might also like
Comments
Loading...