अाॅनलाईन खरेदी, १५ हजारांची फसवणूक

online game

सोलापूर : जुना संगणक विकायचा आहे अशी जाहिरात करुन अाॅनलाईन माध्यमातून 15 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी मोहमद इरफान व मोहंमद मुक्त्यार अहमद ( रा. बंगळुरू) याच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. जुने संगणक विकायचा आहे अशी जाहिरात मोहमद इरफान व मोहंमद मुक्त्यार अहमद ( रा. बंगळुरू) यांनी केली होती. ही जाहिरात पाहून अनिल केरप्पा अाळसंदे मोहमद इरफान आणि मोहमद मुक्त्यार यांच्याशी संपर्क केला.

या दोघांनी आळसंदे यांना 15 हजार रुपयांची रक्कम आयडीबीआय बॅंकेच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार आळसंदे यांनी खात्यात पैसे जमा केले. मात्र, काही दिवसांनी आळसंदे यांच्या घरी दोन रिकामे कागदी लिफाफे आले. ते पाहून आपली फसवणूक झाल्याचे आळसंदे यांना समजताच त्यांनी जोडभावी पोलिसात तक्रार दिली अाहे.