एमजीएम विद्यापिठाच्या गीताचे शुक्रवारी कविता कृष्णमुर्तीच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण

औरंगाबाद : मराठवाड्यातील पहिले स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठ असलेल्या विद्यापीठाच्या गीताचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि.९) सकाळी ११ वाजता ऑनलाईन आयोजित केला आहे. या वेळी ज्येष्ठ गायिका कविता कृष्णमूर्ती यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, एमजीएमचे विश्वस्त प्रतापराव बोराडे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, विद्यापीठ गीताचे गीतकार संजय मोहोड, मुक्ता भिडे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी दिली आहे.

‘अप्पो दीप भव’ हे एमजीएम विद्यापीठाचे घोषवाक्य आहे. तर याच धर्तीवर प्रसिद्ध गीतकार संजय मोहोड यांनी एमजीएम विद्यापीठाच्या गीताची रचना केली आहे. तर प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांच्या सुमधूर आवाजात हे गीत गायले आहे. नरेंद्र भीडे यांनी या गिताला संगीतबद्ध केले आहे. गीताचा लोकार्पण सोहळा ऑनलाईन पद्धतीने फेसबुकवर होणार आहे. त्यासाठी सर्वांनी ऑनलाईन उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिवांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या