Railway- ऑनलाईन रेल्वे आरक्षण साठी आधार अनिवार्य

तिकिटांचे मोठ्या प्रमाणात बुकिंग आणि दलाली टाळण्यासाठी रेल्वेचे ऑनलाईन आरक्षण करण्यासाठी लवकरच आधार क्रमांक बंधनकारक होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
1 एप्रिलपासून विना आधार कार्ड ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सुट मिळणार नाही. मात्र, 31 मार्चपर्यंत त्यांना तिकीट दरात सवलत देण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकताच 2017-18चा नवीन आराखडा सादर केला. त्यानुसार रेल्वेकडून देशभरात 6 हजार पॉइंट ऑफ सेल मशिन आणि एक हजार अ‍ॅटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन बसिवण्यात येणार आहे. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट काढण्यासाठी नोंदणी करताना एकदाच आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. तसेच कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहान देण्यासाठी टिकटिंग हे अ‍ॅप लॉन्च करणार आहे.