सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी शिक्षणमंडळाचे ऑनलाईन प्रिपरेशन पोर्टल

पुणे : उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी, जेईई व नीट परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करता यावी, याकरिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व संख्याशास्त्र या विषयांच्या ऑनलाईन प्रश्नपेढीची निर्मिती करण्यात येत आहे.

 

पोर्टलवरील प्रश्नपेढी अधिक सक्षम व विद्यार्थ्यांच्या उपयोगाची होण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने विषयतज्ज्ञांकडून प्रश्न मागविले आहेत.पोर्टलवर प्रश्न अपलोड करण्याकरिता विषयांना आपले प्रश्न राज्य शिक्षण मंडळाकडे पाठवावे लागणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या तज्ज्ञांकडून प्रश्नांची तपासणी होऊन ते प्रश्न पोर्टलवर अपलोड करण्यात येतील.

 

ज्या शिक्षकांना पोर्टलसाठी प्रश्न द्यावयाचे आहेत, अशा शिक्षकांनी विषयनिहाय प्रश्न तयार करून प्रश्नांच्या तक्त्यात इयत्ता, विषय, घटकाचे नाव व उपघटक तसेच उत्तराच्या विश्लेषणासह ३० सप्टेंबरपर्यंत मंडळाच्या http://neetqb.mh-hsc.ac.in या संंकेतस्थळावर पाठवायचे आहेत.

You might also like
Comments
Loading...