जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

nayodya image

धुळे-जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा १० फेब्रुवारी, २०१८ रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. यासाठी सामान्य सेवा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया २५ नोव्हेंबरपर्यंत आहे. जिल्ह्यातील चारही तालुक्यातील संबंधित मुख्याध्यापकांनी इ. पाचवीत शिकत असलेल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा-२०१८ साठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रोत्साहित करावे असे आवाहन प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.