ऑनलाईन वीजबिल भरणा कोणत्याही शुल्काविना

mseb app photo

बारामती : ग्राहकांना ऑनलाईनद्वारे आपल्या वीजबिलाचा भरणा सुलभतेने करता यावा व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रेडीट कार्डचा अपवाद वगळता नेट बँकिंग, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड, डेबिटकार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास महावितरणने अशा ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क केली आहे.
महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे (www.mahadiscom.in) व महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे ग्राहक वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करू शकतात. ऑनलाईन वीजबिलाचा भरणा करताना केवळ क्रेडीट कार्डद्वारे भरणा केल्यास ग्राहकांना शुल्क आकारण्यात येईल. उर्वरित इतर सर्व पद्धतीने (नेट बँकींग, यूपीआय, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड) वीजबिलाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यास ग्राहकास त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावर Payment History तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. ऑनलाईन वीजबिल भरणा पद्धत अत्यंत सुरक्षित असून यासंदर्भात काही तक्रार अथवा शंका असल्यास ग्राहक [email protected] या ई-मेल आयडीवर महावितरणशी संपर्क साधू शकतात.
ग्राहकांनी वीजबिल भरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहून वीजबिल भरण्यापेक्षा महावितरणने उपलब्ध करुन दिलेल्या निशुल्क ऑनलाईन वीजबिल भरणा सेवांचा फायदा घ्यावा व वीजबिलाचा भरणा ऑनलाईन करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावं’
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने