अमेरिकन नागरिकांना ‘ऑनलाईन’ गंडा घालणाऱ्या तिघा भामट्यांना अटक

online game

पुणे  – अधिकारी असल्याची बतावणी करून ११ हजार अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तिघा भामट्यांना सायबर सेलने अटक केली आहे. नागरिकांची फसवणूक करुन लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे. कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या नाईट कॉलसेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक होत असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पिनॅकल बिल्डींग कोरेगाव पार्क येथे छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

Loading...

तिघा आरोपींकडून पोलिसांनी १ लॅपटॉप, ८ हार्डडीस्क, ३ मोबाईल, ८ हेडफोन आणि काही कागदपत्रे जप्त केली आहेत. पुण्यासह अन्य ठिकाणी रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.सायबर गुन्ह्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तिघा भामट्यांनी पुण्यात बसून अमेरिकेतील नागरिकांना गंडा घातला आहे. आय.आर.एस. अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना टॅक्स भरणा शिल्लक असल्याचे सांगत होते. तसेच टॅक्स भरला नाही तर सहा वर्षांची शिक्षा तसेच मालमत्ता जप्त करण्याची धमकी देत असत. शिवक प्रितमदा लधानी (वय-२९वर्षे), प्रतिक सुभाषचंद्र पांचाल (वय-३०वर्षे), शेरल सतिषभाई ठाकर (वय-३३वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...