मोदींच्या सभेसाठी सहा फुटांचे खंदक, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाची धास्ती

blank

टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यामध्ये जोरदार सभांचा धडाका चालवला आहे, मात्र दुसरीकडे नगरमधील सभेत काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आल्यानंतर, आता नाशिकमध्ये सभा मंचाच्या बाजूला सहा फुटांचे खंदक खोदण्यात येत आहे, नाशिकमध्ये असणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोष पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोदी सरकाच्या चार वर्ष्याच्या कार्यकाळात कांद्याला भाव मिळालेला नाही, त्यामुळे कांदा उत्पादनाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पिंपळगाव परिसरात शेतकऱ्याकडून रोष व्यक्त केला जात आहे. दिंडोरी आणि धुळे लोकसभेच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेच याच भागामध्ये आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सभा मंचाच्या बाजूला बॅरीकेटींग आणि खंदक खोदण्यात येत आहे.

काही वर्षापूर्वी नाशिकमधील डाळिंब परिषदेत नाशिकच्या शेतकऱ्यांनी तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर कांदे फेकले होते. त्यामुळे पूर्वानुभव पाहता नरेंद्र मोदींच्या सभेत देखील कांदा फेकीची घटना घडू शकते. हे टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.