कांदा निर्यातीवरील अनुदान केंद्राकडून बंद, पुन्हा बाजारभाव कोसळण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा: कांदा निर्णयात करण्यासाठी केंद्र सरकारकडून दिले जाणारे १० टक्के अनुदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने कांद्याचे बाजारभाव कोसळण्याची शक्यता आहे.
देशांतर्गत बाजरात कांद्याचे दर घसरल्याने निर्यात वाढवण्यासाठी केंद्राकडून डिसेंबर २०१८ मध्ये अनुदान लागू करण्यात आले होते.

यामध्ये निर्यातदाराला १० टक्के अनुदान दिले जात असल्याने कांद्याचे बाजारभाव काहीकाळ समाधानकारण राहिले. मात्र अवघ्या सहा महिन्यात अनुदान बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

दरम्यान, निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने बाजारावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कांद्याचे भाव कोसळू शकतात.