fbpx

पंतप्रधान पदावरून कॉंग्रेसचा ‘यु टर्न’ … म्हणाले पद मिळाले तर सोडणार नाही

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल पण मोदींना रोखणे हाच एकमेव उद्देश असल्याची भूमिका कॉंग्रेसने मानाडली होती. मात्र आता काँग्रेस पंतप्रधानपदासाठी दावा करणार नाही किंवा इच्छुक नाही हे खरे नाही असे म्हणत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी कोलांटीउडी घेतली आहे.

काँगेस पंतप्रधानपदासाठी दावा करणार नाही किंवा ते या पदासाठी इच्छुक नाहीत, हे खरे नाही. साहजिकच आमचा पक्ष देशातील सर्वांत जुना आणि मोठा पक्ष आहे. जर सर्वांत मोठा पक्ष म्हणून सरकार चालवण्याची आम्हाल संधी दिली तर आम्ही ५ वर्षे सुरळित सरकार चालवू. अस आझाद यांनी स्पष्ट केल आहे.

दरम्यान, जर काँग्रेसच्या बाजूने निकाल आल्यास आम्ही नेतृत्व करु. एनडीएचे सरकार सत्तेत पुन्हा येवू नये हेच आमचे लक्ष्य आहे. सर्वसंमतीने घेण्यात आलेल्या निर्णयाबरोबर आम्ही जाऊ. जोपर्यंत आम्हाला पंतप्रधानपदाची ऑफर दिली जात नाही, तोपर्यंत आम्ही याबाबत काही म्हणणार नाही आणि कोणीही ही जबाबदारी घेत असेल तर त्याला आडकाठीही आणणार नाही. अस याधी आझाद म्हणाले होते. मात्र त्या नंतर या विधानावरून त्यांनी यु टर्न घेतला आहे.