नफरस से नहीं, प्यार से जीतेंगे ; मुंबईत काँग्रेसची पोस्टरबाजी

टीम महाराष्ट्र देशा : संसदेतील सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या घडामोडीनंतर काँग्रेसने देशभरात आपल्या निवडणूक प्रचाराची नवी टॅगलाईन निश्चित केली आहे. नफरस से नहीं, प्यार से जीतेंगे… या टॅगलाईनसह राहुल-मोदींच्या गळाभेटीचा फोटोही पोस्टरवर लावण्यात आला आहे. अमित शहांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ही पोस्टरबाजी सुरु आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी संसदेत वापरलेल्या आपल्या शब्दांची टॅगलाईन करुन मुंबई काँग्रेस ती मुंबईतील रस्त्यांवर घेऊन गेले आहेत. यासाठी काँग्रेसने खास ऑनलाइन आणि ऑफलाइन पोस्टर्स तयार केले आहेत. सोशल मीडियावरुन हे पोस्टर वेगाने व्हायरल झाले आहे. तेच आता मुंबईतील रस्त्यांवर फ्लेक्सच्या रुपानेही पहायला मिळत आहे.