fbpx

पुणे लोकसभा : काँग्रेस तर्फे प्रविण गायकवाड यांचे नाव चर्चेत; सोशलमिडीयावर भावी खासदार म्हणुन पोस्टचा पाऊस

कुर्डूवाडी/हर्षल बागल – पुणे लोकसभा मतदार संघातुन आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्ष कोणाला ऊमेदवारी देणार याकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच अचानक प्रवीणदादा गायकवाड यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासुन सोशलमिडीयावर भावी खासदार म्हणुन पोस्टचा पाऊस पाडला आहे.

राज्यासह देशात बदलेली सामाजिक परिस्थिती, आरक्षण लढ्यातील जुने नेतृत्वं, तसेच बहुजन समाजातील सर्वसमावेशक चेहरा व मिडीयासमोरील एक अभ्यासु प्रखर परखडक नेता अशी प्रविण दादा गायकवाड यांची ओळख आहे. संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे ते प्रदेशअध्यक्ष पद सध्या मोठ्या कामगिरीने सभांळत आहेत.

कोल्हापुर गादीचे वारसदार छत्रपती संभाजी राजे खासदार होण्यापुर्वी राजवाड्याच्या बाहेर राज्यात शिव शाहु यात्रेच्या निमित्ताने संभाजी राजे यांना जनतेच्या समोर आणण्याचं मोठ काम हे प्रविण दादा गायकवाड यांनी केलं आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी भुमिका असलेले एकमेव नेते म्हणुन सध्या सामाजिक संघटना व पक्ष पातळीवर यांच्याकडे काँग्रेस पाहत आहे. पण प्रविण दादा गायकवाड यावर काय निर्णय घेतात हे देखील तितकच महत्वाचं आहे.

शरद पवारांचे विश्वासु निकटवर्तीय –
प्रविणदादा गायकवाड हे व्यावसायाने यशस्वी बिल्डर आहेत. त्याच बरोबर ते सामाजिक नेते म्हणुन असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वसेवा खा. शरद पवार यांचे खास विश्वासु निकटवर्तीय म्हणुन त्यांची ओळख आहे. हि ऊमेदवारी जर काँग्रेस ने दिलीच तर पुणे लोकसभा काँग्रेस साठी सहज मिळु शकते अशाही पोस्ट सोशलमिडीयातुन व्हायरल होत आहेत.