fbpx

‘या’ तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस बसपा करणार आघाडी?

नवी दिल्ली : भाजपविरोधात सर्व विरोधीपक्ष एकजूट दाखवत असल्याने भाजपसमोरील अडचणीत वाढ झालीये. पोटनिवडणुकीत देखील जवळपास सर्वच ठिकाणी विरोधी पक्ष एकत्र आल्याने भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. अलीकडेच पार पडलेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथग्रहण सोहळ्यामध्ये विरोधकांनी एकत्र येत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं.

दरम्यान त्याचाचं एक भाग म्हणून या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यातील निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि बसपा एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेस बसपाला काही जागा सोडण्यासाठी तयार झाली आहे. तसेच जागावाटप आणि आघाडील अंतिम स्वरूप देण्याची जबाबदारी पक्षाने मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ, राजस्थानमध्ये अशोक गहलोत आणि छत्तीसगडमध्ये पी.एल. पुनिया यांच्याकडे सोपवली आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि बसपा प्रमुख मायावती यांच्या अंतिम सहमतीनंतर ही आघाडी होणार असल्याचं वृत्त आहे.

1 Comment

Click here to post a comment