“दहशतवादाच्या पैशातून बनलेल्या मशिदीची होणार जप्ती”

टीम महाराष्ट्र देशा – दहशतवादी संघटना लश्कर ए तोयबाने आर्थिक मदत करून देशात उभा केलेल्या मशिदी आणि मदरशांवर जप्ती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे ‘ईडी’ने याब्बटचा तपास सुरू केला आहे. त्यामुळे देशात ज्या मशिदी आणि मदरसे लश्कर ए तोयबाने दिलेल्या पैशातून उभारण्यात आले असतील त्यांची संपत्ती जप्त करण्याच्या दिशेने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

2018मध्ये दिल्ली येथे एनआयएने लश्कर ए तोयबाच्या दहशतवादातून निर्माण होणाऱ्या आर्थिक मदतीच्या जाळ्याचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी त्या छाप्यात तब्बल 56 कोटी रोख, 43 हजारांचं नेपाळी चलन, 14 मोबाईल फोन, पाच पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आले होते. त्यासोबतच तिघा जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींच्या चौकशीत काही महत्त्वाचे खुलासे झाले होते. त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबात हा निधी आणि त्याच्याशी संबंधित जाळं हे फक्त कश्मीरच नाही तर देशभरातील अनेक मशिदी आणि मदरशांमध्ये फैलावल्याचं समोर आलं आहे. या निधीतून उभारलेल्या मशिदी आणि मदरशांमधून कट्टरतावाद पसरवण्याचे प्रकार सुरू असल्याचंही समोर आलं होतं. याबात जागरणने वृत्त दिले आहे.

या प्रकरणात अटक झालेला मोहम्मद सलमानच्या चौकशीत त्याने लश्कर ए तोयबाकडून मिळणारा पैसा मशिद आणि मदरसे उभारण्यासाठी वापरल्याचं कबूल केल होते. त्यानंतर एनआयएने या मशिदीची तपासणीही केली होती आणि तिथून काही दस्तऐवजही हस्तगत केले होते. लश्कर ए तोयबाचा म्होरक्या कुख्यात दहशतवादी हाफिज सईद हा फलाह ए इन्सानियत नावाच्या एका फेक संघटनेच्या माध्यमातून हा पैसा पुरवत होता. या संस्थेच्या माध्यमातून तो मोहम्मद सलमानला लाखो रुपये पाठवत होता, असं सलमान याच्या कबुलीजबाबातून उघड झालं आहे.