Share

OnePlus Mobile Launch | लवकरच लाँच होणार OnePlus चा ‘हा’ मोबाईल

टीम महाराष्ट्र देशा: OnePlus गेल्या काही महिन्यापासून आपल्या नवीन मोबाईल (Mobile) मॉडेल्सवर काम करत आहे. कंपनी नेहमी आपल्या ग्राहकांना नवीन फीचर्स सह आपले मॉडेल सादर करत असते. त्यामुळे OnePlus च्या मोबाईलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत OnePlus आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये कंपनी आपले दोन मॉडेल्स OnePlus 11 आणि OnePlus 11 Pro लाँच करू शकते.

OnePlus 11

मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus 11 मध्ये देखील Oppo Find N2 सारखेच कॅमेरा स्पेसिफिकेशन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन ट्रिपल रियल कॅमेरा सिस्टीम सहन केला जाऊ शकतो. OnePlus 11 आणि Oppo Find N2 कॅमेरा सोडल्यास यांच्या इतर हार्डवेअर स्पेसिफिकेशन वेगळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, OnePlus 11 या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर उपलब्ध आहे. या फोनचा कॅमेरा मध्ये बोलायचे झाले तर यामध्ये 50-मेगापिक्सलचा Sony IMX890 प्राथमिक कॅमेरा, 48-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड शूटर आणि 32-मेगापिक्सेल Sony IMX709 टेलिफोटो कॅमेरा उपलब्ध असेल.

OnePlus 11 Pro

OnePlus 11 Pro या स्मार्टफोनचे फीचर्स ऑनलाईन लिक झाले होते. लीक झालेल्या माहितीनुसार, OnePlus 11 Pro मध्ये 6.7 इंच AMOLED QHD+डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 50-MP ट्रिपल कॅमेरा सिस्टीम आणि 16MP फ्रंट कॅमेरासह हा फोन सुसज्ज आहे. त्याचबरोबर या फोनच्या स्टोरेजबद्दल बोलायचे झाले, तर या फोनमध्ये 16GB पर्यंत RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध असू शकतो.

तरी, कंपनीकडून अद्यापही या OnePlus 11 मालिकेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कंपनी OnePlus Nord CE 3 5G देखील करू शकते लाँच

OnePlus अनेक दिवसांपासून आपल्या नवीन मॉडेलवर काम करत आहे. कंपनी लवकरच ही OnePlus 11 ही सिरीज लाँच करू शकते. त्याचबरोबर कंपनी OnePlus Nord CE 3 5G या मॉडेलवर देखील काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कंपनी आपले हे मॉडेल लवकरच लाँच करू शकते.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: OnePlus गेल्या काही महिन्यापासून आपल्या नवीन मोबाईल (Mobile) मॉडेल्सवर काम करत आहे. कंपनी नेहमी आपल्या ग्राहकांना नवीन …

पुढे वाचा

Mobile

Join WhatsApp

Join Now