fbpx

‘OnePlus 6’ भारतात लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि किंमत

टीम महाराष्ट्र देशा- वनप्लस 6 हा स्मार्टफोन आज (गुरुवार) भारतात लाँच करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनबाबतचे अनेक लीक रिपोर्ट समोर येत होते. अखेर आज हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. यामध्ये आयफोन X प्रमाणे नॉच, स्लो-मो, स्नॅपड्रॅगन 845 या सारखे बरेच फीचर देण्यात आले आहेत.

या स्मार्टफोनचा मुकाबला iPhone X आणि Galaxy S9 Plusसोबत असणार आहे. अॅमेझोनवर वनप्लस-६ हा स्मार्टफोन २१ मेपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. अमेरिकेमध्ये ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत ५२९ डॉलर(जवळपास ३५,८०० रुपये) एवढी ठेवण्यात आली आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरी असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत ५७९ डॉलर(जवळपास ३९,२०० रुपये) आहे.

स्पेसिफिकेशन –
Display : 6.28-inch
Processor : 2.8GHz octa-core
Front Camera :16-megapixel
Resolution :1080×2280 pixels
OS : Android 8.1 Oreo
Rear Camera : 16-megapixel
Battery Capacity : 3300mAh