fbpx

चारा छावणीमधील शेतकऱ्यांना शिवसेना देणार जेवण

सांगोला : जो पर्यंत राज्यात पाऊस पडून चारा छावण्या बंद होत नाहीत तो पर्यंत शिवसेना चारा छावणी मधील शेतकऱ्यांना जेवण देईल अशी घोषणा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगोला येथे केली. शिवसेनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्यातील दुष्काळी भागात पाहणी करून तेथील शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी सांगोल्यातील गोडसेवाडीतील चारा छावणीला भेट दिली. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. चारा छावणीतील शेतकऱ्यांना शिवसेना एक वेळचे जेवण आणि चहा देणार आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास दोनशे चारा छावणी तील पशुपालकाची जेवणाची अडचण होऊ नये, ही काळजी शिवसेना घेत असल्याची माहिती यावेळी ठाकरे यांनी दिली.