अहमदनगर : अकोले तालुक्यातील महाराष्ट्राचे ऐवरेस्ट म्हणुन परीचित असलेल्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीला
आलेल्या पुरामुळे शिखराच्या पायथ्याशी अडकलेल्या एक हजार पर्यटकांची राजुर पोलिस स्टेशन व जहागिरदार वाडीतील युवकांनी सुखरुप सुटका करन्यात आली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसुबाई शिखराच्या परीसरात शनिवारी सकाळपासुन अतिवृष्टी होत होती . शिखरावरही प्रचंड पाऊस पडत असल्याने संपुर्ण पाणी पायथ्याशी उगम पावलेल्या कृष्णावंती नदीला येऊन मिळत असल्याने कृष्णावंती नदीला पुर आला होता . शनिवार असल्याने सकाळी पावसाचा अंदाज न आल्याने हजारो पर्यटक शिखराच्या दिशेने गिर्यारोहनासाठी रवाना झाले होते.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<