पुलवामा दहशतवादी हल्ला : पुण्यातून एकाला अटक 

पुणे : पुलवामा हल्याप्रकरणी पुण्यातील चाकण परिसरातून एकाला अटक करण्यात आली आहे. बिहार एटीएसमार्फत चाकणमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे लष्कराची माहिती आणि इतर महत्त्वाचे पुरावे सापडले असून त्याला पुढील तपासासाठी त्याला बिहारला नेण्यात आले आहे. जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट जवळ बाळगणारा हा संशयित आहे. शरियत मंडल असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहार पोलिसांनी सोमवारी पुलवामा हल्ल्याप्रकरणी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात केली आहे. काही गुप्तचर संस्थांनी मिळालेल्या माहितीनंतर बिहार पोलिसांनी ही कारवाई सोमवारी केली आहे. या दोघांचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. बिहार एटीएसने पुण्यातून आणखी एकाला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला बिहारला चौकशीसाठी नेण्यात आले आहे. भारतीय लष्कराची माहिती आणि नकाशादेखील त्याच्याकडे मिळाले आहे.
१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे हल्ला झाला होता. ज्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर एअर स्ट्राईक करून भारताने या कारवाईला उत्तर दिलं होतं.

1 Comment

Click here to post a comment