वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत पराभव झाल्यानंतर त्यानंतर देखील डोनाल्ड ट्रम्प यांची आगपाखड सुरूच होती. या दरम्यान समर्थकांनी संसद भवन आणि व्हाइट हाऊसमध्ये तुफान राडा केला. यावेळी हॉलीवूडच्या एखाद्या थरारक चित्रपटाला शोभेल असे नाट्य अमेरिकन संसदेवर रंगले होते.
त्यांनतर जगभरातून ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. तर संसदेत देखील त्यांच्या वर महाभियोग आणण्यात यावा यासठी मागणी जोर धरत होती. या दरम्यान त्यांच्या वर सोशल मिडिया कडून कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गेल्या काही दिवसांत अनेक धक्के बसले आहेत. यामध्ये फेसबुक, ट्वीटर नंतर आता ट्रम्प यांचे युट्यूब चॅनेल आणि स्नॅपचॅट देखील बंद करण्यात आल आहे.
या संदर्भात युट्यूबने सांगितले की, ‘आम्ही ट्रम्पच्या चॅनेल वर अपलोड केलेली नवीन पोस्ट हटवली आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून या चॅनेल वर सात दिवसांसाठी नवीन व्हिडीओ अपलोड करणे आणि लाइव स्ट्रीमिंग बंद करण्यात आले आहेत’. अस युट्यूबने स्पष्ट केले.
तर सोशल नेटवर्किंग अ;ॅप स्नॅपचॅटने कायमस्वरुपी बॅन केलं आहे. आम्ही लोकांच्या हिताची काळजी घेत डोनाल्ड ट्रम्प यांना आमच्या व्यासपीठावर कायमची बंदी घातली आहे अशी माहिती स्नॅपचॅटच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. तसेच ट्रम्प यांच्या अकाउंटवरुन चुकीच्या सूचना, चिथावणीखोर भाषण पोस्ट होत होते. हे आमच्या धोरणाविरोधात होतं, त्यामुळे त्यांच्यावर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली असंही कंपनीने म्हटलं आहे.
याआधी या हिंसाचाराची गंभीर दखल घेत. ट्वीटरने डोनाल्ड ट्रम यांचं अकाऊंट ब्लॉक केलं होत. तर फेसबुक न्यूजरूमने देखील ट्वीट करून डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन धोरणांचं उल्लंघन केल्यानं आम्ही त्यांच्यावर हिंसाचाराच्या धोरणाखाली कारवाई करत असल्याचं सांगितलं होत. मात्र, त्यानंतर ट्विटरने ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप : अतुल भातखळकर यांचा पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा
- धनंजय मुंडेवरील आरोप गंभीर आहेत; पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेऊ
- काही ठिकाणी सेनेचे गुंड उमेदवाराना दमदाटी व धमकी देत आहेत; निलेश राणेंचा आरोप
- महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची ४२८ पदाधिक-यांची मेगा कार्यकारिणी जाहीर
- ‘देशात शेतकऱ्यांचे राज्य पाहिजे मात्र भाजप भांडवलदारांच्या फायद्याचे कायदे करत आहे’