एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणाचे तरुणीवर व स्वतःवर वार

one sided love crime

रत्नागिरी : एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करीत तिच्यासह स्वतःलाही जखमी करून घेण्याची धक्कादायक घटना संगमेश्‍वर तालुक्यातील माखजन येथे आज घडली. या प्रकरणात माखजनच्या बौद्धवाडीतील रोशन भीमदास कदम (वय २१) व दीप्ती मोहन हेमण (१७) अशी गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रोशन भीमदास कदम हा माखजन महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्याची दिप्तीशी ओळख झाली. तो तिच्यावर प्रेम करीत होता. त्याने दीप्तीला लग्नासाठी विचारले होते. मात्र दीप्तीने त्याला नकार दिला होता. गेले काही महिने रोशन कामानिमित्त मुंबईत होता. माखजन शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा असल्याने दोन दिवसांपूर्वीच तो गावी आला होता. दीप्तीचे सध्या दुस-या कुणाशी तरी प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय त्याच्या मनात होता.

Loading...

दीप्ती आपल्या मैत्रिणींसोबत माखजन कबुतर मोहल्ल्यातील रस्त्याने महाविद्यालयामध्ये निघाली होती. त्याचवेळी त्या परिसरात रोशन दबा धरून बसला होता. दीप्तीला पाहताच त्याने तिच्यावर पाठीमागून काचेच्या फुटक्या बाटलीने व धारदार चाकूने सपासप वार केले. हातातील बाटली त्याने दीप्तीच्या खांद्यावर फोडली. त्यामुळे दीप्ती गंभीर जखमी झाली. दीप्तीसह तिच्या मैत्रिणींची आरडाओरड ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा रोशनने चाकूने स्वतःवर वार केले. उपस्थित ग्रामस्थांनी तात्काळ दोघांनाही संगमेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

डॉ. आगाशे यांनी तातडीने उपचार केल्याने दीप्तीचे प्राण वाचवले तर रोशनवरही उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच संगमेश्‍वरचे पोलिस निरीक्षक महेश थिटे, माखजन दूरक्षेत्राचे हे.कॉ. डी. एस. पवार व सहकारी घटनास्थळी गेले. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे
संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे 'पिसाळलेला कुत्रा':निलेश राणे
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
'अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते  कामाला वाघ आहेत'
नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका
'हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही, आज सातारा बंद