ग्राहकाच्या एक रुपयाला सुद्धा धक्का लागणार नाही- सुभाष देशमुख

blank

टीम महाराष्ट्र देशा : सुरुवातील लोकमंगलने सोलापूर जिल्ह्यात खाजगी तत्वावर कारखाना चालवण्यासाठी पुढाकार घेतला. कारण त्यावेळी सहकारी तत्त्वावर साखर कारखाने चालू करण्यासाठी परवाने मिळणे कठीण होते, त्यामुळे लोकमंगलने खाजगी तत्वावर साखर कारखाना उभा केला, लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज (लोकमंगल साखर कारखाना) १९९८ साली ६ महिने ६ दिवसात उभारला. यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीने भागभांडवल उभा करण्यात आले. सेबीच्या नियमानुसार केवळ ५० सभासद बनविता येतात. परंतु हा नियम माहिती नसल्याकरणामुळे लोकमंगलकडून शेतकरी सभासद जोडले गेले.

वास्तविक ही बाब सर्रासपणे सर्व कारखाने करतात. परंतु सदर बाब चुकीची आहे. असे सेबीने लक्ष्यात आणून दिल्यानंतर सभासदांच्या माध्यमातून गोळा केलेली रक्कम परत करण्याचे काम चालु आहे. आतापर्यंत मागणी येईल तशा सर्वांचे पैसे परत करण्यात येत असून, उर्वरित कोणत्याही शेतकऱ्यांचे भागभांडवल लोकमंगल बुडविणार नाही. तांत्रिक अडचणीमुळे या प्रक्रियेला विलंब होत आहे. सेबीकडून लोकमंगल ऍग्रोचे डिमॅट आणि म्युचअल फंडचे अकाउंट सीझ केले आहे, यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये त्यांच्या खात्यावर बिलं जमा करण्यात येतील. व अन्य सभासदांनी देखील चिंता करू नये. असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केले आहे.

सदर प्रकरणी लोकमंगल कडून किंवा स्वतः सुभाष देशमुख यांच्याकडून कोणाचाही एक छदाम देखील बुडवला जाणार नाही. सेबीने केलेल्या कारवाईमध्ये लोकमंगल साखर कारखाना बीबीदारफळचे खाते, म्युचअल फंड, शेअर्स आदी खाती सीझ करण्यात आली आहेत. यामध्ये लोकमंगल समूहाच्या कोणत्याही वित्तीय संस्थेचे, व लोकमंगल समुहाचे इतर उद्योगाचे खाते अथवा व्यवहार यावर निर्बंध आलेले नाहीत. तसेच ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्या ऊस बिलावर अथवा व्यवहारावर निर्बंध घातलेली नाहीत. त्यामुळे सदर वित्तीय संस्थेच्या सभासदांनी अथवा खातेदारांनी चिंता करण्याचे कारण नाही व घाबरून जाण्याची कारण नाही.