जावेद अख्तर यांच्याकडून एक रूपया मानहानी वसूल करण्यात यावी; न्यायालयात दावा दाखल

जावेद अख्तर यांच्याकडून एक रूपया मानहानी वसूल करण्यात यावी; न्यायालयात दावा दाखल

javed akhatr

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या संघटनांची विचारसरणीदेखील तालिबानसारखीच असल्याचे वक्तव्य प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केले होते. यावरून बराच वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात ठाण्यातील न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे.

खटला दाखल केल्यानंतर न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस पाठवत पुढील सुनावणीसाठी प्रत्यक्षात न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. जावेद अख्तर यांच्या विधानामुळे संघाची प्रतिमा मलिन झाली आहे असा आरोप या याचिकांतून केलेला आहे.

दरम्यान, या विधानांवरुन जावेद अख्तर यांना अन्य एक वकील संतोष दुबे यांनी देखील कायदेशीर नोटीस बजावली आहे ज्यात हे विधान मागे घेण्याची मागणी केलेली आहे. यामुळे जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता विवेक चंपानेरकर यांनी हा दावा दाखल केला असून यामध्ये अख्तर यांच्याकडून एक रूपया मानहानी वसूल करण्यात यावी अशी मागणी यात केली आहे. याच प्रकारे मुंबईच्या मुख्य न्यायालयातही एका वकिलाने अख्तर यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. यामुळे जावेद अख्तर यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या