दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला वेग,लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर – काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन ऑल आऊट मोहीम अधिक तीव्र केल्यानंतर लष्कराने शुक्रवारी सकाळी अजून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील स्रीगुफवारा भागात सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीमध्ये लष्कराने या तीन दहशतवाद्यांना ठार केले असून, या चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे

रमझान महिन्यात लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी उठवल्यानंतर दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला वेग आला आहे. जम्मू काश्मीरचे डीजीपी एस पी वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पहाटे ही चकमक सुरु झाली होती. त्यावेळी तीन ते चार दहशतवादी परिसरात लपले असल्याची माहिती मिळाली होती. तिनही दहशतवाद्यांचा मृतदेह हाती लागला आहे. चकमकीत एक पोलीस जवान शहीद झाला असून दोन नागरिक जखमी झाले आहेत’.

दरम्यान, पुलवामामध्ये अतिरेकी लपून बसल्याची खबर लागल्याने सुरक्षा दलाने पुलवामामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. काचीपोरा परिसरात हे अतिरेकी लपून बसल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

काश्मिरमध्ये काँग्रेस पीडीपीला पाठिंबा देणार नाही : गुलाब नबी आझाद

जम्मू कश्मीरमधील अभद्र युतीला उद्धव ठाकरेंचा विरोध होता- संजय राऊत