अखेर वन प्लस फाइव्ह भारतामध्ये लाँच पहा काय आहेत फिचर

चीनमधील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘वन प्लस’ने काल (दि 22) ‘वन प्लस फाइव्ह’ हा भारतामध्ये लाँच केला आहे.  मुंबईमध्ये झालेल्या एका शानदार सोहळ्यामध्ये वन प्लस फाइव्ह लाँच करण्यात आला . हा फोन ६ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. फोनच्या खरेदीसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक असून २७ जूनपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशनला सुरुवात होईल. भारतीय मोबाईल युझर्समध्ये मागील अनेक आठवड्यांपासून चर्चा होती. या फोनचे फिचर्स पाहाता वन प्लस फाइव्हने चाहत्यांना निराश केले नसल्याच दिसत आहे.

वन प्लस फाइव्हचे फिचर
दोन प्रकारांमध्ये फोन उपलब्द

1. ६ जीबी रॅम आणि ६२ जीबी स्टोरेज

2. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज

कलर – ब्लॅक आणि स्लेट ग्रे

स्क्रीन – ५.५ इंच

Rohan Deshmukh

आयफोन ७ प्रमाणे पूर्णपणे मेटॅलिक लूक

२.५ गीगाहर्त्झचा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर

७.११ नॉगेट अॅण्ड्रॉइडवर हा फोन काम करेल

ड्युएल सीम फोन ज्यात जीएसएम, सीडीएमए,एचएसपीए, एलटीई

बॅटरी – ३३०० एमएएच

कंपनीच्या दाव्यानुसार आत्तापर्यंत सर्वात स्लिम स्मार्टफोन आहे

किंमत –
६ जीबी रॅम  – ३२ हजार ९९९ आहे
८ जीबी रॅम – ३७ हजार ९९९ आहे

Latur Advt
Comments
Loading...