सावकारांच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या

Suicide crime

सोलापूर – दोन सावकारांच्या त्रासाला कंटाळून चळे येथील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरसाळे येथे ही घटना घडली. सत्यवान दगडू वाघमारे (वय ४२, रा. चळे, ता. पंढरपूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सावकारांसह तिघांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सतीश गांडुळे, पवन बचुटे (रा. पंढरपूर) या दोघा सावकारांसह सत्यवान यांचा मेहुणा समाधान बजरंग बाबर (रा. गुरसाळे, ता. पंढरपूर) याचा संशयितात समावेश आहे. सत्यवान वाघमारे यांनी जमीन घेऊन त्यांचा मेहुणा समाधान यांच्या नावावर केली होती. ती जमीन घेण्यासाठी सत्यवान यांनी पतसंस्थेचे कर्ज घेतले होते. पतसंस्थेतील कर्ज देण्यासाठी सत्यवान यांनी समाधान यांना पैसे मागितले. समाधान यांनी त्यांना माझी जमीन असून, त्याच्याशी तुझा काही संबंध नसल्याचे म्हटले.

यामुळे सत्यवान यांनी पतसंस्थेचे कर्ज फेडण्यासाठी येथील गांडुळे व बचुटे या दोघांकडून व्याजाने पैसे घेतले. या पैशासाठी या सावकारांनी तगादा लावला. या सावकारांकडून सतत होणाऱ्या दमदाटीला कंटाळून सत्यवान हे चळे येथील राहत्या घरातून निघून गेले.