fbpx

माझे कूठेही बँकेत खातेसुद्धा उघडलेले नाही- अण्णा हजारे

Anna Hazare

पारनेर / स्वप्नील भालेराव : आजच्या धावत्या जीवनशैलीत माणूस सुखासाठी फक्त वेड्यासारखा पळतोय. सुखी राहण्यासाठी इतरांना फसवून आपला फायदा कसा होईल याकडे लक्ष आहे. आत्मीक सुख जर मिळवायचे असेल तर कूठल्याही अपेक्षा ठेवून जगू नका. फक्त कार्य करत रहा सुख आपोआप तुमच्या मागे येईल. तसेच मी पैशामागे धावलो नाही कधीच कारण मी कधी पैसा जमवलाच नाही आणि माझे कूठेही बँकेत खाते सुद्धा उघडलेले नाही. ज्याच्याकडे जास्त पैसा तेवढे विकार जास्त तेवढा मानसिक ताण जास्त कारण अशी व्यक्ती फक्त सुखामागे धावत असते मात्र मला अशा गोष्टींची कधी गरजच भासली नाही. असे मत पद्मभूषण अण्णा हजारे यांनी अळकूटी येथे जेष्ठ व श्रेष्ठ मातृ पितृ तुल्यांचा अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा निमित्त व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास जिल्ह्याचे खासदार दिलीप गांधी व इतर राजकीय नेते उपस्थित होते. श्री.कुंदन  साखला यांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून हजारो जेष्ठांना एकत्र आणून त्यांचा सन्मान करण्यात आला. पारनेर तालुक्यातील जेष्ठांसाठीचा हा पहीलाच भव्य दिव्य कार्यक्रम अळकूटीत संपन्न झाल्याने या कार्यक्रमाचे कौतूक खा. दिलीप गांधी यांनी केले.