देशाच्या अंतर्गत सुरक्षेविषयक स्वतंत्र आराखडा तयार केला जाणार ?

टीम महाराष्ट्र देशा : देशभरातील पोलीस प्रमुखांच्या कालपासून पुण्यात सुरु झालेल्या राष्ट्रीय परिषदेत आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत सकाळी 10च्या सुमारास ते परिषदस्थळी आले. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन परिषद अर्थात आयसरच्या सर सी व्ही रमण सभागृहात ही परिषद होत असून देशभरातून सुमारे 200 प्रतिनिधी त्यास उपस्थित आहेत.

परिषदेसाठी अतिशय कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून संस्थेतील विद्यार्थी कर्मचाऱ्यांनाही पासशिवाय प्रवेश दिला जात नाही. तत्पूर्वी आज सकाळी पंतप्रधान मोदी यांनी आयसरच्या योगा केंद्रात येऊन परिषदेला उपस्थित असणाऱ्या प्रतिनिधीं समवेत योगासने केली.

आज दिवसभर मोदी आणि अमित शहा परिषदेला पूर्णवेळ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. उद्या या परिषदेचा समारोप होणार असून देशाच्या अंतर्गत सुरक्षेविषयक स्वतंत्र आराखडा या वेळी तयार केला जाण्याची शक्यता आहे .

दरम्यान, पुण्यात आज राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा व मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला.

महत्वाच्या बातम्या