मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली, आरेच्या स्थगिती नंतर पण कामाला वेग?

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. मात्र आरेतील या परिसरात काम सुरूच आहे. मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली तरीही आरेतील जमीन नष्ट करण्याचे काम अजूनही थांबलेले नाही, सातत्याने जमिनीच्या पोटात यंत्र शिरण्याचा आवाज येत असल्याचे स्थानिक सांगतात. एमएमआरडीएचे प्रमुख हे, ‘मुख्यमंत्र्यांनी कारशेडला स्थगिती दिली आहे, तरीही कारशेडमध्ये जाण्यासाठी रॅम्पचे काम नेमके कशासाठी असा प्रश्न उपस्थित करत आहे.

प्रजापूर पाडा येथील आदिवासींच्या घरांना तडे गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या कामाचा वेग आणि आवाज प्रचंड वाढला असून रात्रीचाही सातत्याने ड्रिलिंगचा आवाज येत असल्याचे, दोन-तीन घरांमधील भांडीही हादरे बसून खाली पडली. स्थानिक सांगत आहे.

मेट्रो ३ ही भुयारी असून सीप्झनंतर कारशेडमध्ये जाण्यासाठी ती जेव्हीएलआर ओलांडल्यानंतर रॅम्पच्या माध्यमातून आरेमध्ये जमिनीवर येणार होती. प्रजापूर पाड्याजवळ हेच काम सुरू आहे. मात्र, यासंदर्भात याचिकादार अमृता भट्टाचारजी यांनी आरेत कारशेडला स्थगिती मिळाल्यावर रॅम्पचे काय काम असा प्रश्न उपस्थित केला आहे. रॅम्पचा खर्च केला अशी कारणे देऊन मग कारशेडलाही चालना देता येईल, असा यामागचा छुपा हेतू असल्याचीही टीका त्यांनी केली.

वनशक्तीचे संचालक डी. स्टॅलिन यांनीही यावर आक्षेप नोंदवला आहे. जंगलातील जमीन नष्ट करण्यापेक्षा यासंदर्भात निर्णय आल्यानंतर पुढील कार्यवाही करता येईल. आरेतील कामावर स्थगिती दिली तर संपूर्ण मेट्रोचे काम पुढे सरकत नाही, असे अजिबात नाही. मग रॅम्पवर खर्च करण्याचे कारण काय असे त्यांनी विचारले आहे.

महत्वाच्या बातम्या