कॉंग्रेसला धक्का; आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर

टीम महाराष्ट्र देशा : नाही होय, नाही होय म्हणता म्हणता अखेर विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र भाजपमध्ये दाखल झाले आहेत. सुजय यांच्यासह त्यांच्यापत्नी धनश्री यांनी देखील भाजप प्रवेश केला आहे. कॉंग्रेसला हा मोठा धक्का मानला जात असताना आता मुंबईत देखील आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading...

मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहावेळा विधानसभेवर निवडून आलेले काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयांच्या बँनर वर काँग्रेस नेत्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचा फोटो छापण्यात आल्याने कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दादर येथील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयासमोरच कालिदास कोळंबकरांनी बँनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून मनसुबे जाहिर केलेत .

कोण आहेत कालिदास कोळंबकर?

कालिदास कोळंबकर हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक समजले जातात. गिरणगावातील नायगाव या विधानसभा मतदारसंघातून ते सहावेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. शिवसेनेपासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली. राणे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी कोळंबकर यांना राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री केले होते. राणे यांनी पुन्हा काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वाभिमानी पक्ष स्थापन केला. परंतु या पक्षाच्या तिकिटावर मुंबईतील वडाळा मतदारसंघातून निवडून येणे अशक्य असल्याने कोळंबकर यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचे मनाशी पक्के केले असून, सन २०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीत ते वडाळा मतदारसंघात भाजपकडून उभे राहतील, अशी चर्चा आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...