अलिबाग : अन्वय नाईक प्रकरणी बुधवारी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली. रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली होती. काल, अर्णबच्या जामीनावर सुनावणी झाली मात्र तिथे देखील त्याला न्यायालयाने दिलासा न दिल्याने आज त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
अर्णबच्या जामीनावर आज मुंबई उच्च नायालयात सुनावणी झाली. मात्र, कोणताही निकाल समोर आला नसून याबाबत पुढील सुनावणी आता लांबणीवर गेली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात निकाल न देता अर्णबला सत्र न्यायालयाचे दार ठोठावण्यास सांगितले आहे. आज रविवार असल्याने अर्णबला आजची रात्र देखील कारागृहात काढावी लागणार असून उद्या म्हणजेच सोमवारी त्याच्या वकिलांना जामीनाविषयी सत्र न्यायालयात याचिका दाखल करता येईल.
दरम्यान, अर्णब गोस्वामी याची खारघर येथील तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सद्या त्याला कारागृहातील विलगीकरण कक्षातच ठेवण्यात येईल. दुसरीकडे अलिबागच्या मुख्य़ न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, या सुनावणीनंतर अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायलयात त्याच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केला होता. या अर्जावर देखील काल जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असता, अर्णबच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी घेतली जाईल असे सत्र न्यायालयामार्फत सांगण्यात आल्याने उद्या त्याच्या जामीनावरील सुनावणी सोबतच न्यायालय अर्णबला पोलीस कोठडी सुनावणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे पदवीधर मतदार संघातून मनसेकडून रुपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर
- जो बायडेन यांच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी दिल्या खास शुभेच्छा!
- टीकेची झोड उठल्यानंतर अखेर गोव्यातील सनबर्न फेस्टिवल रद्द !
- ‘… तर मराठा आरक्षणासाठी आता अख्खं मंत्रालय जाळून टाकू’
- पु.ल. देशपांडे यांना गुगलची डुडलद्वारे मानवंदना!