धुळे हत्याकांड : चिथावणी देणारा आणखी एक आरोपी गजाआड

 टीम महाराष्ट्र देशा : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात पाच जणांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. दशरथ पिंपळसे असे या आरोपीचे नाव आहे. ५ जुलैला पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी महारू पवारला अटक केली होती.

लहान मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात पाच जणांची हत्या करण्यात आली होती. रविवारी १ जुलैला राईनपाडा येथे आठवडी बाजार भरला होता. ५ लोक बाजाराच्या ठिकाणी एसटीतून उतरले होते. मुले पळवणारी टोळी बाजारात आल्याची अफवा बाजार परिसरात पसरल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला. मारहाण इतकी क्रूर आणि बेदम पद्धतीने करण्यात आली की या मारहाणीतच या सगळ्यांचा जीव गेला.

या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला होता. त्यामुळे ही घटना समोर आली. सुरुवातीला लोक त्यांना चपलांनी मारत होते. त्यानंतर काही तरुणांनी त्यांना राईनपाडा गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात डांबले आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली.

या प्रकरणात एकूण २६ आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आली असून आणखी १५ आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती धुळे पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी दिली.

धुळ्यातील गुंड गुड्ड्याच्या हत्येचा तपास आता मुंबई क्राइम ब्रांचकडे

Rohan Deshmukh

आ. संग्राम जगताप यांना केडगावमधील दूहेरी हत्याकांडाच्या दोषारोपपत्रातून वगळले

संतापजनक! गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन तरुणाची हत्या करणाऱ्यां आरोपीचा मंत्र्याकडून सत्कार

Latur Advt
You might also like
Comments
Loading...