fbpx

आणखी एका कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्याने लढण्याआधीच मैदानातून काढला पळ

rahul-sonia

टीम महाराष्ट्र देशा – उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला नियोजनशून्यता आणि अंतर्गत गटबाजीचा चांगलाच फटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेस उमेदवार, ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेश काँग्रेस जाहीरनामा समितीचे प्रमुख राशिद अल्वी यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

उत्तर प्रदेशमधील राशिद अल्वी यांना अमरोहा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु वैयक्तीक कारणांचा हवाला देत अल्वी यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले.दरम्यान, आता अल्वी यांच्या जागी बळीचा यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.दरम्यान, अल्वी यांच्या जागी सचिन चौधरी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात देखील कॉंग्रेसच्या उमेदवारीवरून अनेक वाद होताना पहायला मिळत आहेत. काँग्रेसने चंद्रपुरातील उमेदवार बदलला असून, आता शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्याची नामुष्की कॉंग्रेसवर ओढवली आहे.

काल कॉंग्रेसने उमेदवारांची नववी यादी जाहीर केली. याआधी चंद्रपुरात काँग्रेसने आधी विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी बांगडे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आणि धानोरकरांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली होती. ती मागणी काँग्रेसच्या वरिष्ठांनी मान्य करत धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली.