सरकार कडून नाणार होणारचचे संकेत ; आणखी एका कंपनीशी करार

टीम महाराष्ट्र देशा : रत्नागिरी जिल्ह्यातील वादग्रस्त नाणार प्रकल्पासंदर्भात सरकारने आणखी एका कंपनीशी करार केला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत दुबईत आणखी एक महत्त्वाचा करार करण्यात येणार आहे. अबूधाबी नॅशनल ऑईल कंपनीही या महाकाय प्रकल्पात भागीदारी करणार आहे.

सौदी अराम्कोनं करारावेळी आपला वाटा नंतर एका स्ट्रॅटेजिक पार्टनरसोबत शेअर करण्याचा इरादा व्यक्त केला होता. त्यानुसार आता अराम्को आणि अबूधाबी नॅशनल ऑईल कंपनी यांच्यात हा प्राथमिक करार होत आहे. शिवसेनेने विरोध केल्यानंतर देखील सरकारने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता शिवसेना सरकारच्या विरोधात कस उत्तर देणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

You might also like
Comments
Loading...