Breaking : राहुल फटांगडे हत्या प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात

पुणे : 1 जानेवारी रोजी सणसवाडी आणि कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. यामध्ये अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती तर अनेक जण जखमी झाले होते. तर जमावकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात राहुल बाबाजी फटांगडे (वय.३१) याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या आधी तीन आरोपींना अटक करण्यात आले असून, अद्याप ४ आरोपींचा तपास सुरु असल्याचंही पोलिसांच्या वातीनं सांगण्यात आलं होतं.या प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

दरम्यान आता राहुल फटांगडे यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत.या आरोपींच्या संदर्भात माहिती देण्याचं आव्हान पोलिसांनी स्थानिक नागरिकांना देखील केलं होतं.आता याच  प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. चतुश्रुंगी पोलिसांनी हि कारवाई केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चतुश्रुंगी पोलिस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक श्री.वाघमोडे यांच्या नेतृत्वात हि कारवाई करण्यात आली.

पुणे पोलिसांनी सोलापूरच्या माढा तालुक्यातील टेंभुर्णीतून सुरज रणजीत शिंदेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपी पुण्यातील दौंड तालुक्यातील भीमनगरचा मूळ रहिवासी आहे.वरील छायाचित्रातील बनियन घातलेल्या आरोपीला अटक केली आहे.