चिंताजनक : 1 ऑगस्ट पर्यंत भारतात ‘इतक्या’ लाख लोकांच्या मृत्यूशी शक्यता, अमेरिकेतील संस्थेचा अंदाज

corona

नवी दिल्ली : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील स्थिती गंभीर झाली आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. या लाटेतील कोरोना स्ट्रेन हा अधिक धोकादायक असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे.

भारतात कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा वाढत आहे. मंगळवारी गेल्या 24 तासात देशात कोरोना-संक्रमित 3,449 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, अमेरिकेतील अव्वल जागतिक आरोग्य संशोधन संस्थेने असा अंदाज लावला आहे की, कठोर उपाययोजना न केल्यास 1 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतात 10 लाखाहूनही जास्त कोरोनाने मृत्यू होऊ शकतो. संस्थेने यापूर्वी या तारखेपर्यंत 960,000 मृत्यूचा अंदाज लावला होता.

या प्राणघातक रोगामुळे, गेल्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येत 78% वाढ झाली आहे. अमेरिकेत, बिडेन प्रशासनातील उच्च अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) जॅक सलिव्हियन यांनी एबीसी न्यूजला सांगितले की, भारतात कोरोना नियंत्रणा बाहेर गेला आहे.’

इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन आपल्या पॉलिसी ब्रीफिंगमध्ये म्हटले आहे की, ‘आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी कठोर उपाययोजना तसेच सामाजिक अंतर आणि मास्क वापरण्याबाबत भारताची परिस्थिती खूपच वाईट दिसते.’ या संस्थेचा अंदाज आहे की 1 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतात 1,019,000 लोकांचा मृत्यू होऊ शकतो. हे अंदाज 25 ते 30 एप्रिल दरम्यानच्या आकडेवारीवर आधारित आहे. इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनच्या म्हणण्यानुसार, जर पुढच्या आठवड्यात 95% परिस्थिती नियंत्रणात आणली तर हा आकडा 73 हजारांनी कमी होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या