गावात होणार एक लक्ष दिव्यांची आरास अन् माजी सरपंच बसणार उपोषणास

uposhan

आष्टी : तालुक्यातील लहान आर्वी येथील माजी सरपंच सुनिल साबळे यांनी परीसरातील विविध मागण्यासाठी १ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली असून मागण्या मान्य न झाल्यास २ ऑक्टोंबर गांधी जयंतीपासून लहान आर्वी, अंतोरा उपोषणाचा इशारा दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे गांधी जयंतीनिमित्त ज्या जिल्ह्यात एक लाख दिव्यांची आरास होणार आहे तेथेच माझी सरपंचाने हा असा इशारा दिलेला आहे.

लहान आर्वी- अंतोरा रोडवरील वाघाडी नाल्यावर आमरण उपोषणाला बसणार आहेत्यात पुढील मागण्या विशद केल्या आहे आर्वी-अंतोरा रोडवरील वाघाडी नाल्यावर आमरण उपोषणला बसणार असल्याचा पत्रकाद्वारे दिला आहे. विशेष म्हणजे महात्मा गांधींच्या जयंतीची तयारी वर्धा जिल्ह्यात मोठ्या धूम धडाक्यात सुरू आहे. अशाच माजी सरपंचाने उपोषणाला बसणे योग्य नसल्याची चर्चा गावात आहे.

लहान आर्वी परीसरातील अंतोरा मार्गावरील वाघाडी नाल्यावर मोठय़ा पुलाचे बांधकाम करणे, श्रीराम मंदीर ते विठ्ठलापुर-पोरगव्हाण रस्त्याचे मजबुतीकरण करणे, लहान आर्वी येथे अतीरीक्त विशेष बाब म्हणुन महावितरणचे डी.सी. कार्यालय मंजुर करणे ,लहान आर्वी(श्रीराम मंदीरपासुन पोरगव्हान पंचाळा कडे जंगलातुन गेलेली महवितरणची विद्युत लाईन आष्टीवरून वळती करणे.

लहान आर्वी वार्ड नं.२ मधे नवीन डी.पी.(रोहीत्र)मंजुर करणे(लहान आर्वी येथे मुस्लीम कब्रस्तानसाठी जागा मंजुर करणे. शौचालय लाभार्थ्यांचे अनुदान ग्रामसेविकेने रोखल्यामुळे लाभार्थ्यांना अनुदान देय करून ग्रामसेविकेवर कारवाई करणे. आदी विविध मागण्यांसाठी तालुका, जिल्हा आणि पोलिस प्रशासनाला निवेदनाचे उपोषण देण्यात आले आहे.

माजी सरपंच साबळे यांचा पाठपुरावा गेल्या अनेक वर्षापासुन प्रशासनाकडे सुरू आहे.परंतु प्रशासनाने अनेक वर्षापासुन केलेल्या मागणीला केराची टोपली दाखवल्याने सुनिल साबळे यांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबीला आहे त्यावर प्रशासन काय करते याकडे परिसरात उत्सुकता आहे.

महत्वाच्या बातम्या :-