बापरे! विनापरवानगी झाडे तोडल्यामुळे एक लाखाचा दंड !

लातूर : शहरात अजब प्रकरण समोर आले आहे. रात्रीच्या सुमारास दोन मोठ्या झाडाची अनाधिकृतपणे तोड केल्या प्रकरणी महानगरपालीकेने एक लाखांचा दंड ठोडवला आहे. पुष्पा ओमप्रकाश सोमणी असं दंड करण्यात आलेल्यांचे नाव. तसेच हा दंड लवकर न भरल्यास मालमत्ता करातून ही वसूली करण्यात येईल, असंही लातूर महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलय.

लातूर महानगरपालिकेची परवानगी न घेता व महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ कलमाचे उल्लंघन करुन अनाधिकृतपणे २ बदामाचे वृक्ष ३० फूट उंचीचे व २३ इंच झाडाचा व्यास असलेले १० वर्षापूर्वीचे वृक्ष तोडले असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने उपरोक्त कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी प्रत्येकी एक वृक्षाचे रु ५०,००० याप्रमाणे २ वृक्षाचे रक्कम एक लाख एवढ्या रकमेची दंडात्मक कार्यवाही केली आहे. सदरील दंड आपण नगदी स्वरुपात न भरल्यास आपल्या मालमत्ता करातून सदरची वसूली करण्यात येईल, असं महानगरपालिकेने दिलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात शहरात पर्यावरण दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. यामध्ये अनेक झाडांची लागवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे रात्रीस झाडांची कत्तल होत असल्याने पर्यावरणवादींकडून मोठी चिंता व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP