औरंगाबाद- बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Aurangabad Nath Valley School bus accident

औरंगाबाद/प्रतिनिधी– समर्थनगर परिसरात स्कुल बसने धडक दिल्याने वृद्ध दुचाकीस्वार जागीच ठार झाला़ ही घटना दुपारी दोनच्या सुमारास क्रांती चौक पोलीस स्टेशन च्या समोर घडली. अपघात झाल्याचे कळताच पोलीस घटनास्थळी पोहचुन त्यांना घाटीत दाखल केले़.

Loading...

या घटनेबाबत पोलीस सुत्रांनी अशी माहीती दिली की, लहाणु घुगे (वय ५३) हे अदालत रोडकडून दुचाकीवर (एमएच-२० डीएन-३००१)  निराला बाजारात जात होते़ बसला ओव्हरटेक करतांना घुगे यांची मोटरसाईकल स्लीप झाल्याने त्यांचा तोल गेला़ तेव्हा त्यांच्या मागील बाजुने नाथ व्हॅली शाळेची स्कुल बसने (एमएच- २० एए- २२८८)  घुगे यांना धडक दिली़. धडक दिल्यानंतर बसच्या मागील चाकाचा धक्का त्यांच्या दुचाकीला लागल्याने ते खाली कोसळले़ त्यांचे हेल्मेट तुटल्याने डोक्याला गंभीर मार लागला़. गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव जोरात सुरू झाला़ जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. मृत घुगे हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी होते, त्यांचा मृत्यु झाल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. हे सगळे चित्र पाहता बसचालक व सोबतीच्या एका व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढला़ त्यानंतर अर्धा ते एक तास बस रस्त्यावर उभी असल्याने वाहनांची कोंडी  झाली़ पोलीसांनी बस ढकलुन चालु करून क्रांती चौक पोलीस ठाण्यात घेऊन गेले. धडक देऊन फरार झालेला बसचालक पुंडलिक नरवडे यास अटक केली़ पुढील तपास पोलीस करत आहे.

हेल्मेट असते तर जीव वाचला असता
जर हेल्मेट चांगले आपल्या डोक्याला बांधले असते तर कदाचीत जीव वाचला असता अंदाज नागरीकांनी व्यक्त केला. नागरीक हेल्मेटचा वापर करतात पण फक्त देखाव्यापुरते करत असल्याने निष्पाप लोंकाचा जीव देखील गमवावा लागतो.

मारहाणीच्या भीतीने चालक ठाण्यात

दुचाकीस्वार घुगे गतप्राण झाल्याचे पाहून बस अपघातस्थळी सोडून अपघातानंतर बस चालक पुंडलिक नरवडे याने थेट क्रांती चौक ठाणे गाठले. हातून अपघात झाल्याची कबुली दिली. जमाव मारहाण करेल, म्हणून आपणहून ठाण्यात आल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी नरवडे यास ताब्यात घेतले. या प्रकरणाची चौकशी पोलिस उपनिरीक्षक काचमांडे हे करीत आहेत.

रस्त्याजवळच लावलेल्या वाहनांमुळे अपघात

समर्थनगर रस्त्यावरील हॉटेल अगदी रस्त्यापर्यंत आले आहेत. हॉटेल आणि क्लासेसला येणारे अनेकजण दुचाकी सर्रास रस्त्यावर लावतात. त्यामुळे रहदारीसाठी अतिशय कमी रस्ता राहतो. परिणामी गाड्या अगदी एकमेकांचा चिकटून चालतात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. अशा प्रकारच्या अतिक्रमणांमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्तेदेखील धोकादायक बनले आहेत.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...