धुळ्यात पेट्रोल पंपावरील दरोड्यात एकाचा मृत्यू, २ जखमी

धुळे : धुळे शहराजवळ एका पेट्रोल पंपावरील दरोडेखोरांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. मारहाणीत पेट्रोलपंपावरील पोकलँड चालकाचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. या सशस्त्र दरोड्यात पेट्रोल पंपाचे दोन कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.
पेट्रोलपंपावरील कर्मचारी तसेच पेट्रोलपंपावरील पोकलँड चालक आणि दरोडेखोरांमध्ये यावेळी झटापट झाली, या झटापटीत पोकलँड चालकाचा मृत्यू झाला, तर दोन कर्मचारी जखमी झाले.दरम्यान, ही संपूर्ण घटना पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाली असल्याने पोलीस सीसीटीव्हीचा आधार घेऊन पुढील तपास करीत आहेत.धुळे शहराजवळील सुरत -नागपूर हायवेवरील कोयल पेट्रोल पंपावर हा दरोडा पडला. कोयल पेट्रोलपंप हा फागणे गावानजीक आहे. दरोडेखोरांनी दरोडेखोरांनी पंपावरील 10 हजाराची रोकड लंपास केली. पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास हा दरोडा पडला असावा, असं सांगण्यात येत आहे.